छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्यासाठी सुरू असलेल्या २,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे पाणी आता अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, हे पाणी शहरात पोहोचताच प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने नळांना वॉटर मीटर बसवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक नळ कनेक्शनला लक्ष्य केले जाणार असून, त्याबाबतची पूर्वतयारी करण्याचे आदेश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नव्या योजनेतून जूनपासून शहराला २०० एमएलडी वाढीव पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने कंबर कसली आहे. पहिल्या दिवशी ५० १२
एमएलडी वाढीव पाणी शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. आहे. त्यानंतर महापालिकेकडून नवीन नळ कनेक्शन देण्यासोबतच त्याला मीटर जोडण्याची कार्यवाही सुरू केली जाईल. शहरात सुमारे ३६ हजार व्यावसायिक नळ कनेक्शन असून, त्यांना शहरातील ज्या भागात सध्या जुनी पाणी वितरण वाहिनी आहे, ती पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. त्याऐवजी आधुनिक आणि सक्षम अशी नवीन वितरण वाहिनी टाकली जाईल. या नवीन वाहिनीवरूनच नागरिकांना नवीन नळ कनेक्शन दिले जाईल. या प्रत्येक कनेक्शनला मीटर बसवणे बंधनकारक असेल. पहिल्या टप्प्यात केवळ नवीन व्यावसायिक नळ जोडणीलाच मीटर लावले जातील, असे मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.i Powered By: Vrudhee Solutions











